तळेगाव : पोलीस आयुक्तांकडून मध्यरात्री सायकलवरुन लॉकडाउनचा आढावा; गस्तीवरील पोलीसही चक्रावले!

Commissioner of police Krishn Prakash
Commissioner of police Krishn Prakash

तळेगाव स्टेशन : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर थेट चिंचवडहून तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याला सायकलिंग करत भेट दिली. पहाटे सव्वातीनच्या सुमारास अचानक ट्रॅकसूटसह सायकलवर अवतरलेल्या पोलीस आयुक्तांना पाहून रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेले ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील चकित झाले.

अभ्यासू, करारी, कुठल्याही दबावाला बळी न पडणारं व्यक्तिमत्व अशी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची ओळख आहे. पोलीस दलातील फिटनेसचा सिम्बॉल म्हणून ख्याती पावलेल्या कृष्णप्रकाश यांनी विकेंड लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कुठलीही पूर्वसूचना न देता पोलीस आयुक्तलयापासून जवळपास तीस किलोमीटरवर असलेल्या तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला शनिवारी पहाटे  सायकलवर धावती भेट दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आढावा घेऊन ते पुढे चाकणच्या दिशेने सायकलवर रवाना झाले. 

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी आयुक्त कृष्णप्रकाश यांना लॉकडाउन आणि तळेगाव दाभाडे परिसरात लोकसहभागातून ग्रामसुरक्षा दलाच्या सहकार्याने प्रभाविपणे चालू असलेल्या रात्रगस्तीबद्दल माहिती दिली. दीड महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या स्वयंसेवकांना लाठी, शिट्टी आणि ओळखपत्र प्रदान कार्यक्रमात तळेगाव पॅटर्न यशस्वी होणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला होता. 

सलून दुकानांत चिकन अन् कापड दुकानांत भाजीपाला!

तळेगावच्या या सायकलस्वारी दरम्यान चाकण मार्गावरील मराठा क्रांती चौकात ग्रामसुरक्षा दलाच्या स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या जागृकतेबद्दल कौतुक आणि समाधान व्यक्त करत लोकसहभागातून ग्रामसुरक्षेचा तळेगाव पॅटर्न यशश्वी झाल्याची पोचपावती आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यावेळी स्वयंसेवकांना दिली. गणवेशाविना, डोक्यात हेल्मेट नीळा-पांढरा ट्रॅकसूट, स्पोर्ट्स थ्री फोर्थ, पायात मोजे आणि पांढरे शुभ्र स्पोर्ट्स शूज या पेहरावात अनपेक्षितपणे सायकलवर प्रकटलेल्या आयर्नमॅनच्या या स्पोर्टी लूकने प्रभावित झालेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या स्वयंसेवकांना सेल्फीचा मोह आवारता आला नाही. आयुक्तलयापासून दूर ग्रामीण भागातील तळेगाव परिसरात इतक्या मध्यरात्री सायकलवर भेट देणारे कृष्णप्रकाश हे पहिलेच पोलीस आयुक्त ठरल्याने शनिवारी त्यांची ही सायकलस्वारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
  

तळेगाव स्टेशन : मराठा क्रांती चौकात ग्रामसुरक्षा दलाचे स्वयंसेवक आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com