

Tragic Accident Hits Kartiki Wari
Sakal
तळेगाव दाभाडे : कार्तिकी वारीसाठी आळंदीला निघालेल्या दिंडीत मंगळवारी (ता. ११) सकाळी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील कामशेत परिसरात कंटेनर घुसला. त्याखाली चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर दहा वारकरी जखमी झाले. वारकरी रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडली.