

Talegaon Dabhade Election Update
esakal
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाच्या ६ प्रभागांमधील निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम व निवडणूक आदेश जाहीर करण्यात आला असून, आवश्यक असल्यास या प्रभागांतील जागांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. इतर प्रभागांतील सदस्य निवडणूक तसेच सर्व प्रभागांतील नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू राहणार आहे.