

Talegaon Dabhade sees low turnout as voter list confusion and ward discrepancies create chaos.
Sakal
तळेगाव स्टेशन : मतदारांना गृहीत धरुन बिनविरोध झालेल्या बहुतांश नगरसेवकपदाच्या जागा,६ जागांवरील मतदानाला ऐनवेळी मिळालेली स्थगिती आणि मतदान केंद्रावर पोहोचल्यावर उघड झालेला मतदारयाद्यांमधील नावे आणि प्रभागाचा घोळ आदींच्या पार्श्वभूमीवर गोंधळून गेलेल्या तळेगाव दाभाडेमधील नागरिकांमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच निरुत्साह जाणवला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह आणि तीन प्रभागातील ४ जागांसाठी मंगळवारी (ता.०२) डिसेंबरला मतदान होत आहे.