

Talegaon Dhamdhere CCTV Footage Reveals the Thieves
Sakal
तळेगाव ढमढेरे : कासारी बाह्यवळण रस्त्यालगत शेतकऱ्यांनी स्थापन केलेली ऍग्रो प्रोडूसर ही मका पिकाची देवाण-घेवाण करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मुख्य विभागातील कार्यालयाचा दरवाजा उचकटून कपाटातील ३३ हजार रुपये रोख रकमेसह १० हजार रुपये किमतीचा एलईडी असे एकूण ४३ हजार रकमेचा माल व धनादशाचे पुस्तक चोरांनी लंपास केले असून, चोरीची घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.