Eco Friendly Wedding : तळेगाव ढमढेरे येथे डी.जे, फटाके, भाषणबाजीविना; वेळेवर पार पडलेले आदर्श शुभविवाह समारंभाचे कौतुक!

DJ Free Wedding : तळेगाव ढमढेरे येथे डी.जे, फटाके आणि भाषणबाजीविरहित साध्या पद्धतीने वेळेत शुभविवाह संपन्न झाला. धनंजय गायकवाड यांच्या निर्णयाचे मान्यवरांनी कौतुक करत समाजात सुधारित विवाह पद्धतीची चर्चा रंगली.
Talegaon Dhamdhere Hosts Noise-Free, Simple Wedding Ceremony

Talegaon Dhamdhere Hosts Noise-Free, Simple Wedding Ceremony

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात कोणताही डामडौल न करता रविवारी शुभविवाह पार पडला. कोंढापुरी (ता. शिरूर) येथील राष्ट्रपती पारितोषिक विजेते व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक धनंजय गायकवाड यांची उच्चशिक्षित कन्या निशिगंधा आणि फलटण तालुक्यातील लक्ष्मण तावरे यांचे चिरंजीव ऋषिकेश यांचा शुभविवाह अत्यंत साध्या पद्धतीने वेळेवर संपन्न झाला. लग्न सोहळ्यात कर्कश आवाज करणारा डी.जे व त्याबरोबर नाचणारी तरुणाई नव्हती. विविध क्षेत्रातील उपस्थित असलेल्या मान्यवरांची सूत्रसंचालकांनी नावे घेतली नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com