

Talegaon Municipal Elections: High Police Deployment for Law and Order
Sakal
तळेगाव स्टेशन : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तळेगाव दाभाडे शहरातील १४ मतदान केंद्रे आणि नगररिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह इतर महत्वाच्या ठिकाणी तब्बल पाचशे पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातर्फे दंगल नियंत्रण पथक,राज्य राखीव दल,गृहरक्षक दलासह २ दिवस पथसंचलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह आणि 3 प्रभागातील ४ जागांसाठी मंगळवारी (ता.०२) डिसेंबरला सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होत आहे.नगरध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे.