

Talegaon Shikrapur Highway Traffic Disrupted by Sheep Goat Market Roadside Parking Creates Major Congestion
sakal
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गालगत सोमवारी (ता. १०) शेळी-मेंढी बाजारामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेला प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती.