
Shiv Shambhu Statue
Sakal
तळेगाव स्टेशन : तळेगावकरांनी पाहिलेले श्री शिव शंभू स्मारकाचे स्वप्न दिड दशकांनंतर अखेर साकार झाले.तळेगाव दाभाडे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या श्री शिवशंभू तिर्थ स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ फुट उंचीच्या भव्य समुहशिल्पाचे अनावरण सोमवारी (ता.२०) श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.