पुणे : तळजाई टेकडी बनतेय 'कपल पॉईंट'

पुणे : तळजाई टेकडी बनतेय 'कपल पॉईंट'

पुणे : तळजाई टेकडी ही नागरिकांसाठी आकर्षण आणि पर्यटनस्थळ बनत आहे. मात्र, तळजाई टेकडीवर नागरिकांबरोबर महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे प्रमाण वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण तळजाई टेकडी परिसरात बसून अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे तळजाई टेकडी ही 'कपल पॉईंट' बनत आहे.

शाळा, महाविद्यालय सुटल्यावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यत तळजाई टेकडीवर, रस्त्यावर, सीमा भिंतीवर सर्वत्र तरुण-तरुणी मौजमजा मस्ती करत असतात. तसेच काहीवेळा एकमेकांना मिठी मारूनही बसलेले दिसत असतात, याचा त्रास फेरफटका मारायला येणाऱ्या महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक व उच्चशिक्षित नागरिकांना होत आहे.

दरम्यान, तळजाई टेकडीवर भविष्यात अनूचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षितेसाठी पोलिस बदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com