
Shivshambhu Statue
Sakal
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहरातील पहील्याच आणि राज्यातील सर्वात मोठ्या नियोजित शिवशंभू स्मारक समुहशिल्पाच्या १४ फुट उंच पुतळ्यांचे बुधवारी (ता.२४) रात्री उशिरा आगमन झाले. क्रेनच्या सहाय्याने भव्य असे समुहशिल्प नियोजित चौथ-यावर स्थानापन्न करण्यात आले.या निमित्ताने तळेगावातील शिवप्रेमींचे गेल्या दिड दशकांचे स्वप्न अखेर साकार झाले असून पुढील महिन्यात स्मारकाचे अनावरण होणार आहे.