esakal | देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी - औरंगाबाद (Aurangabad) मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अश्र्वारुढ पुर्णाकृती शिल्पाची (Statue) उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नऱ्हे- धायरी पुणे येथे आज पहाणी केली. (Tallest Statue of Chhatrapati Shivaji Maharaj to be Erected in Aurangabad)

शिल्पकार दीपक थोपटे यांच्याकडे या शिल्पाच्या निर्मितीची जबाबदारी आहे. दीपक थोपटे यांनी यापूर्वी अकलूज येथील शिवसृष्टी, शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले जिजाऊ आणि बाल शिवराय, पुण्यातील चिंचवड येथील चाफेकर बंधू शिल्प,  श्रीशैलम येथील शिवराय स्मारक, सिंहगड येथील नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि परिसरातील मावळ्यांची शिल्पे, जेजुरी रेल्वे स्टेशन येथील बानुबाईचा वाड्याची प्रतिकृती तसेच देश-विदेशातील अनेक शिल्पे घडवली आहेत. महाराष्ट्रातील हे या प्रकारचे शिवरायांचे आत्तापर्यंतचे सर्वात भव्य शिल्प असणार आहे. हे शिल्प महाराष्ट्रातच नव्हे तर तर देशात आणि जगभरात शिवरायांची किर्ती पोचवण्याचे कार्य करणार आहे. या भव्य धातू शिल्पाची निर्मिती पुण्यातील तरुण शिल्पकार दीपक थोपटे आणि त्यांचे सहकारी हे करत आहेत हेसुद्धा पुण्यनगरीचा बहुमान वाढवणारे ठरणार आहे.

हेही वाचा: एआयसीटीई आणि डीआरडीओच्या सहकार्याने एम.टेक अभ्यासक्रम सुरू

यावेळी सुभाष देसाई म्हणाले, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे  दिपक थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारुढ पुर्णाकृती शिल्प हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल. हा पुतळा  अतिशय रेखीव व देखीव असा झालेला आहे. या पुतळयाचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल अशा भावनाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केल्या.

शिल्पकार दीपक थोपटे म्हणाले, औरंगाबाद महानगपालिकेने आम्हला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याची संधी दिली होती. तसेच कमी कालावधीत हि मूर्ती साकरण्यात आली आहे. देशातील सर्वात उंच मूर्ती औरंगाबाद शहरात स्थपन करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे, शहर अभियंता एस डि पानझडे, मुंबईतील जे जे स्कुलचे कला महाविद्यालय नितीन मिस्त्री, अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे, नगरसेविका अश्विनी पोकळे, राजाभाऊ रायकर, इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, शहरप्रमुख गजानन थरकुडे, भरत कुंभारकर, सुनीता खंडाळकर, महेश पोकळे, नीलेश गिरमे, किशोर पोकळे, राजू चव्हाण,  दत्तात्रेय जोरकर, अनिल बटाने, योगेश पवार, संग्राम गायकवाड उपस्थित होते.

यावेळी स्थानिक शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

loading image