आंबेगाव तालुका बंद गुरुवारी शांततेने करण्याचा निर्णय : अॅड. सुनील बांगर

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मंचर : “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेगाव तालुका बंदची हाक क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता.९) देण्यात आली आहे. हे बंद आंदोलन शांतता मार्गाने केले जाईल. मंचर व घोडेगाव येथे प्रभातफेरी काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.’’ अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांनी दिली.

मंचर : “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेगाव तालुका बंदची हाक क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता.९) देण्यात आली आहे. हे बंद आंदोलन शांतता मार्गाने केले जाईल. मंचर व घोडेगाव येथे प्रभातफेरी काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.’’ अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. ४) बंद आंदोॆलनाची तयारी करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अॅड. बांगर बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाळासाहेब बाणखेले, अरुण गिरे, राजाराम बाणखेले, उपसरपंच महेश थोरात, बाबुराव बांगर, गणपतराव इंदोरे यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक वामन बाजारे, प्रवक्ते अॅड. शुभम घाडगे व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील सर्व १०५ गावे बंद राहण्यासाठी शाळा, महाविद्यालये, व्यापारी, शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याबरोबर पत्र व्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोठेही जबरदस्ती करू नये. सकल मराठा समाज नेहमीच पोलीस व प्रशासनाला सहकार्य करत आहे. पण पोलिसांनीहि विनाकारण चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये. आंदोलनाला गालबोट लागणार नाही. याची काळजी घ्यावी.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा, वारकऱ्यांचे भजनी मंडळ, महिला, विद्यार्थी आंदोलनाच्या अग्रभागी ठेवावे. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. आंदोलनात अनोळखी व्यक्तीचा प्रवेश होऊ नये म्हणून टेहळनी पथक कार्यरत करण्याचा व शिवाजी चौकात ठिय्या आंदोंलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. “मुस्लिम समाजाच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल.’’ असे राजू इनामदार यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत दत्ता थोरात, वसंतराव बाणखेले, अजय घुले, संतोष बाणखेले, बाबासाहेब खालकर, बाजीराव महाराज बांगर, अशोक काळे, शरद शिंदे, सुरेश निघोट, प्रवीण मोरडे, प्रशांत काळे, सचिन बांगर, श्रीराम बांगर आदींनी भाग घेतला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taluka ambegav closed from thursday said dr sunil bangar