कोरोनाच्या पिंजऱ्यात अडकले तमाशा कलावंत

tamasha.jpg
tamasha.jpg

टाकळी हाजी (पुणे) : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले. पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी जत्रा रद्द करण्यात आल्याने तमाशाचे कार्यक्रम बंद पडले. त्यामुळे गेले चार महिने या कलाकारांना उपासमार सहन करावी लागत आहे.

यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे तमाशा कलाकार सध्या कोरोनाच्या पिंजऱ्यात अडकल्याचे पहावयास मिळत आहे. लोकनाट्य तमाशात काम करणाऱ्या कलाकारांनी उपजिवीका कशी भागवायची हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. लोकनाट्य तमाशा ही लोककलेची पारंपारीक कला समजली जाते. या कलेतून समाज प्रबोधना बरोबर मनोरंजन करण्याचे काम पिढ्यानपिढ्या करणारे कलावंत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रंगमंचावर सादर केलेली कला यातून मिळणारी बिदागी त्यातून आठ महिऩे चालणारा प्रंपच या सगळ्या गोष्टी कलाकारांचे अर्थार्जन सांगत असते. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात लॅाकडाऊन सुरु झाले अन् या सगळ्या कलाकारांना घरी बसावे लागले. यात्रा जत्रांमधून होणारे अर्थार्जन थांबले. कलाकांराबरोबर फडमालक देखील हात घाईला आले. यात्रा हंगामासाठी उभे केलेले भांडवल कलाकारांना दिलेल्या आगाऊ उचलमध्ये संपले. मिळालेल्या सुपाऱ्यांचे पैसे परत करावे लागले. तोंडाला रंगरंगोटी करून फळ्यांच्या गाडीमधून होणारा दररोजचा प्रवास त्यातून प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरे जात रात्र जागवित ही कला जोपासण्याचे काम करावयाचे. पण गेल्या चार महिन्यापासून या कलाकारांना कोरोनाच्या पिंजऱ्यात अडकल्याची भावना निर्माण झाली आहे. या कलाकारांच्या समस्या घेऊन अनेक दिग्गज फडमालक शासन दरबारी न्याय मागावयास गेले. मात्र त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आल्याचे अनेक तमाशा कलावंत बोलून दाखवतात. 
 

यात्रा - जत्रांनंतर गणेशोत्सवात लोकनाट्य तमाशाच्या सुपाऱ्या मिळत असतात. मात्र कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे तमाशा कलावंताना उपासमारीची वेळ आली आहे. शासन दरबारी काहीतरी योजना तयार करून तमाशा कलावंताना राजाश्रय मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय ढोलकी फडमालक तमाशा कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी केली आहे.  
 

पिढ्यान पिढ्या कलेची आवड व सादरीकरणासाठी मिळालेली संधी यामुळे लोकनाट्य कलेची जपवणूक केली. दुष्काळ व महामारीच्या काळात समाजाला आरोग्याचे महत्व पटवून दिले. हम दो हमारे दो यामधून जनजागृती करून लोकसंख्येला आळा घातला, पण या कोरोनाच्या काळात या कलाकारांकडे लक्ष देण्यास शासन निष्क्रियता दाखवते हे कलाकारांवर अन्याय केल्या सारखे आहे.

-मालती इनामदार नारायणगावकर, नृत्यांगणा व फडमालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com