

Tamhini Ghat accident
esakal
ताम्हिणी घाटात एक महिंद्रा थार गाड खोल दरीत कोसळली. या भयानक अपघातात पुण्यातील सहा तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात तीन दिवस कोणालाच समजला नाही. मृतदेहांसह गाडी घाटातील घनदाट जंगलात लपलेली होती. अखेर गुरुवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी ड्रोनच्या साहाय्याने अपघाताचे ठिकाण शोधण्यात पोलिसांना यश आले.