
Bus Accident: ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.
तीन महीला, दोन पुरुषांचे मृतदेह बाहेर काढले, अद्याप दोन बसमध्ये अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 13 जण गंभीर जखमी आहेत.