Tamhini Ghat Records 580 mm Rain in 24 Hours
esakal
मुळशी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. विशेषतः ताम्हिणी घाट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत तब्बल 580 मिमी पावसाची नोंद झाली. या दमदार पावसाचा थेट फायदा मुळशी धरणाला झाला असून, अवघ्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 2.95 टीएमसीची वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3.53 टीएमसीवरून 6.48 टीएमसीपर्यंत पोहोचला असून, धरण आता सुमारे 32.13 टक्के भरले आहे.