
Tanisha Bhise Report: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं उपचारांमध्ये हेळसांड केल्यानं गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा ससूनच्या समितीनं केलेल्या चौकशीचा अहवाल शासनाकडं आणि पुणे पोलिसांकडं पोहोचला आहे. त्यामुळं अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या आणि रुग्णालयांचा उद्दामपणा समोर आणणाऱ्या या प्रकरणात आता अहवालातून काय समोर येतंय याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.