
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती तनिषा भिसे या महिलेचा पैसे भरले नसल्याच्या अभावाने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आज पुणे बालेवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार अमित गोरखे यांनी पीडित भिसे कुटुंबासहित भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विषय समजून घेऊन संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती विचारली.