
Warje Traffic Jam
Sakal
शिवणे : कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर वारजे डुक्करखिंडीत सकाळच्या गर्दीच्या वेळी दुधाचा टँकर आणि कंटेनर बंद पडला. त्यामुळे मुंबईकडे जाणारा महामार्ग ठप्प झाला होता. वारज्यातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती, तर शिवणे ते कोथरूडपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दीड तास जीव कोंडून थांबावे लागले. यातून प्रशासनाने धडा घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.