

-समाधान काटे
मयूर कॉलनी : कोथरूड, बावधन, एरंडवणे, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, शास्त्रीनगरसह पश्चिम पुण्यातील हजारो नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात अडकले आहेत. मात्र या संकटावर उपाययोजना करण्याऐवजी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग ढिम्म असल्याचे चित्र समोर आले आहे. एक दिवसाआड आणि तेही कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांच्या टाक्या तळाला गेल्या असून नागरिकांना आंघोळ, स्वयंपाक आणि पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकावे लागत आहे.