जास्त पाऊस पडणाऱ्या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु

Tanker water supply started in the rain-hit village
Tanker water supply started in the rain-hit villageesakal
Updated on

खडकवासला : हवेली तालुक्यातील पश्चिम भागात म्हणजे खडकवासला धरण परिसरात जास्त पाऊस पडणाऱ्या ठाकरवाडी (आगळंबे), गायकवाडवाडी (बहुली), पेठ- भिलारवाडी- भवानीनगर (घेरा सिंहगड) या गावात जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई असते. या गावात दरवर्षी जून ते ऑक्टोबर या काळात अंदाजे १२०० ते १७०० मिलिमीटर पाऊस पडतो. येथे दरवर्षी एप्रिल ते मे अखेर किंवा पाऊस लांबला तर १५ जून पर्यत पाणी टंचाई जाणवते. खडकवासला धरणात जास्त पाणी येणारे ओढे हे खामगाव मावळ, आगळंबे, अहिरे गावातून वाहत येतात. आणि याच भागात पाणी टंचाई आढळते आणि येथे दरवर्षी दोन ते तीन महिने पाण्याचा टँकर पुरवावा लागतो.

Tanker water supply started in the rain-hit village
पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

बहुली गायकवाड वाडी येथे रविवारी दि.२५ एप्रिल रोजी पहिला टँकर पोचला. ग्रामपंचायत सदस्य मोहन गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, तुषार गायकवाड, राज महाले, अमोल गायकवाड, दत्ता पाटणकर, राहुल गायकवाड, दत्ता गायकवाड, तुषार गायकवाड यांनी टँकरचे स्वागत करीत प्रशासनाचे आभार मानले.

टँकर सुरू करण्याची प्रक्रिया प्रांताधिकारी सचिन बारवकर व गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तहसीलदार सचिन कोळी, स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, यांनी पार पाडली. आदेश आल्यानंतर काही तांत्रिक अडचणी हवेली तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा अधिकारी शिल्पा सोरटे आणि पांडुरंग गवळी यांनी त्या पाठपुरावा करून सोडविल्या.

''टँकरचे आदेश जिल्हा प्रशासनाने १६ तारखेला दिले. परंतु टँकर अभावी पाणीपुरवठा सुरू झाला नाही. म्हणून आम्ही हवेली उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना भेटून टँकर प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. त्यास जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तर उर्वरित गावांना देखील लवकर टँकर सुरू करावा. अशी मागणी आहे. यावेळी विधानसभा प्रमुख नितीन वाघ, सचिन पासलकर व महेश पोकळे सोबत होते. ''

-रमेश कोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Tanker water supply started in the rain-hit village
पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

पातळी खाली गेली

''खामगाव मावळ, मोगरवाडी व चांदेवाडी व माळवाडी मधील सार्वजनिक विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. उर्वरित कमी पाणी सर्वांना समान पाणी देण्याची पद्धत सुरू आहे. टँकरचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. ''

-सतीश नवघणे, सरपंच खामगाव मावळ

आता टाकीच भरत नाही

''खाडेवाडीची १०हजार लिटरची टाकी दोन तासात भरत होती. आता बोअरला पाणी नसल्याने टाकी पूर्ण भरत नाही. अशीच अवस्था वांजळेवाडी, सोनारवाडी, मोकरवाडीची आहे. टँकरची गरज आहे.''

- युवराज वांजळे, सरपंच आहिरेगाव

लोकसंख्या / टँकरचा खेपा/ पुरवठा लिटरमध्ये

ठाकरवाडी-१६१०/१/ १२०००

पेठ- भिलारवाडी- भवानीनगर- ९३५/२/२०,०००

बहुली गायकवाडवाडी- ७१६/१/३८,६४०

Tanker water supply started in the rain-hit village
पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com