

Sakal
घोडेगाव : घोडेगाव ( ता आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) विभागाने पुणे जिल्ह्यातील आदिवासी समुदायांच्या एकात्मिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. हा करार आज 25 नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आला आहे.सामंजस्य करार तीन आर्थिक वर्षांसाठी २०२५-२६, २०२६-२७ आणि २०२७-२८ पर्यंत सुरू राहणार आहे . या उपक्रमातून आदिवासी समुदायाच्या 'कर्तव्ये, जबाबदाऱ्या, अधिकार आणि हक्क' याबद्दल ज्ञान, माहिती आणि शिक्षण देऊन लोकसहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.आंबेगाव, वेल्हे, भोर आणि जुन्नर या तालुक्यात याची अंमलबजावणी होणार आहे.