

व्यावसायिक ईव्ही क्षेत्रात
टाटा मोटर्सची आघाडी
मुंबई, ता. २२ ः टाटा मोटर्स कंपनीला विविध क्षेत्रांतून ३,४०० हून अधिक इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी (ईसीव्ही) ऑर्डर मिळाल्या असून, देशातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
या ऑर्डरमध्ये जवळपास दोन हजार लहान वाहने व पिक-अप, जवळपास ९०० ट्रक आणि ५०० बस यांचा समावेश आहे. या वाहनांचा वापर ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी व एफएमसीडी वितरण, शहरांतर्गत वाहतूक यांसारख्या विविध कामांसाठी, तसेच सिमेंट, स्टील, खाणकाम आणि विमानतळावरील वापरासह आंतरराज्यीय व शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी केला जाणार आहे. यातून इलेक्ट्रिक वाहनांवरील ग्राहकांचा वाढता विश्वास आणि देशाचे शून्य-उत्सर्जन उद्दिष्ट पुढे नेण्यात टाटा मोटर्सचे नेतृत्त्व अधोरेखित होते.
गेल्या १२ महिन्यांत, कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत लक्षणीय वाढ केली आहे. एस प्रो ईव्ही, एस ईव्ही आणि इंट्रा ईव्ही, प्राइमा ईव्ही ५५टी ट्रॅक्टर आणि प्राइमा ईव्ही २८टी टिपर सारखी व्यावसायिक वाहने तर प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात स्टारबस ईव्ही आणि अल्ट्रा ईव्ही बसेस शहरांतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीला मोठे पाठबळ देत आहेत. विविध शहरांमध्ये ३,८०० हून अधिक इलेक्ट्रिक बस कार्यरत आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.