esakal | हिंजवडीतील IT कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका; टाटा टेक्‍नॉलॉजीमधील ८०० हून अधिक जणांच्या नोकर्‍या धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीतील IT कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका; टाटा टेक्‍नॉलॉजीमधील ८०० हून अधिक जणांच्या नोकर्‍या धोक्यात

हिंजवडी येथील टाटा टेक्‍नॉलॉजीच्य अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी

हिंजवडीतील IT कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका; टाटा टेक्‍नॉलॉजीमधील ८०० हून अधिक जणांच्या नोकर्‍या धोक्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : हिंजवडीतील येथील टाटा टेक्‍नॉलॉजीमधील ८०० हून अधिक कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील आयटी कर्मचाऱ्याची संघटना राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटनं (NITES) पुण्यातील कामगार आयुक्‍तांकडे टाटा टेक्नॉलॉजीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार केली आहे. NITES या संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा म्हणले की, 'हिंजवडी येथील टाटा टेक्‍नॉलॉजीच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात अवैधरित्या कामावरुन हटवल्याच्या तक्रारी आल्या आहेत.'

हरप्रीत सलुजा सकाळ ऑनलाइनशी बोलताना म्हणाले की, ''आयटी कंपनीनं जून २०२० मध्ये जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना सक्तीवर सुट्टीवर पाठवलं होतं. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत यांना कोणतेही वेतन देण्यात आलं नाही. यादरम्यान त्यांच्या कॉर्पोरेट विमाचे रकम कंपनीमार्फत भरली जात होती. टाटा टेक्‍नॉलॉजीसारखी आयटी कंपनी औद्योगिक कायद्या आणि दुकाने व आस्थापना कायद्या अंतर्गत येते. कंपनीच्या या बेकायदेशीर कामांमुळे आता ८०० हून अधिक कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत.''

हरप्रीत सलुजा म्हणाले की, एक मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या या बेकायदेशीर कामांमुळे आता ८०० हून अधिक कर्मचार्‍यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीने ३१ मार्च २०२० रोजी जारी केलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्देशांचे, नियमांचे आणि इतर वैधानिक कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. नैसेन्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिनेट - या दुर्दैवी घटनेमुळे आयटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवंतपणाचा धोका असलेल्या खूपच चिंतित आहे. आयटी उद्योगात काम करणारे बरेच कर्मचारी कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत आणि ते आधीच भीतीने काम करीत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजवर कठोर कारवाई करावी आणि कर्मचार्‍यांना प्रलंबित पगाराची त्वरित सुटका करावी, अशी मागणी नाइट्सने केली आहे.
 

loading image