
A Wave of Poisoning Kills 15 Sheep in Ambegaon's Tawarewadi; Shepherd Budha Choromale Suffers a Devastating Loss of ₹3 Lakhs.
Sakal
पारगाव : टाव्हरेवाडी ता. आंबेगाव येथे आज बुधवारी सायंकाळी बुधा बारकू चोरामले या मेंढपाळाच्या ३० मेंढ्यांना विषबाधा होऊन १५ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर परिसरातील खासगी पशुवैद्यकांनी वेळीच उपचार केल्याने १५ मेंढ्यांना वाचवण्यात यश आले. विषबाधेचे कारण समजू शकले नाही.