करांचे उद्दिष्ट फुगवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - नव्या योजना राबविण्यासाठी हमखास उत्पन्न मिळणाऱ्या प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा जास्त वाढविले आहे. त्यात, बांधकाम विभागाचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे सुमारे १३५ कोटी रुपयांनी, तर मिळकतकर आणि सर्वसाधारणकराचे उद्दिष्ट प्रत्येकी तब्बल शंभर कोटींनी वाढविले आहे.त्यापाठोपाठ पाणीपुरवठा विभागाचे (मीटर) उत्पन्न सुमारे ६० कोटी रुपयांनी वाढविले आहे. 

बांधकाम विभागाचे उद्दिष्ट ११६० कोटी

पुणे - नव्या योजना राबविण्यासाठी हमखास उत्पन्न मिळणाऱ्या प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा जास्त वाढविले आहे. त्यात, बांधकाम विभागाचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे सुमारे १३५ कोटी रुपयांनी, तर मिळकतकर आणि सर्वसाधारणकराचे उद्दिष्ट प्रत्येकी तब्बल शंभर कोटींनी वाढविले आहे.त्यापाठोपाठ पाणीपुरवठा विभागाचे (मीटर) उत्पन्न सुमारे ६० कोटी रुपयांनी वाढविले आहे. 

बांधकाम विभागाचे उद्दिष्ट ११६० कोटी

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असतानाही स्थायी समितीने मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा समावेश आहे. त्याकरिता पुरेशा आर्थिक तरतुदीचे नियोजनही केले आहे. मात्र, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट वाढविण्यावर स्थायी समितीचा भर असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक मंदीमुळे गेल्या वर्षभरात बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले असतानाही महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या विभागाच्या उद्दिष्टात वाढ केली होती. त्यानुसार या विभागाला १ हजार २५ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, तर स्थायी समितीने १३५ कोटी रुपयांची वाढ करीत, बांधकाम विभागाला या वर्षाकरिता तब्बल १ हजार १६० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. 

मिळकतकराचे १८०० कोटी

मिळकतकरात वाढ होत असल्याने स्थायी समितीने पुन्हा त्यात वाढ केल्याचे दिसून आले असून, महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात १ हजार ७१६ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते, तर स्थायी समितीने १ हजार ८०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. शहरात मीटरच्या पाणीपट्टीचे उद्दिष्ट वाढले असून, स्थायी समितीने १५० कोटी ६७ लाखांचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर आयुक्तांच्या अर्थसंकल्पात या विभागासाठी ९० लाख ६७ कोटी उद्दिष्ट होते.

महापालिकेतील याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या पद्धतीला बाजूला सारून पहिल्यांदाच वास्तववादी अर्थसंकल्प मांडला आहे. नव्या योजनांच्या अंमलबजावणीकरिता अर्थसंकल्पातील आकडे फुगविलेले नाहीत. शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, हा यंदाच्या अर्थसंकल्पाचा उद्देश आहे. प्रभागांच्या पातळीवर एकसारखा विकास व्हावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक असा भेदभाव न करता निधीचे वाटप केले आहे. दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्ष असूनही माझ्या प्रभागात फारसा निधी घेतला नाही. नागरिकांचा हा अर्थसंकल्प असून, त्याला पारदर्शकतेची जोड दिली आहे.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
नर्सिंग कॉलेज - (५) 

नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार. कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे महापालिकेची रुग्णालयांमधील सेवा सुधारणार. 
आरोग्य तपासणी योजना - ५० लाख
शहरातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळणार. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य उपलब्ध होणार.
औषधालये (५० लाख) 
विविध आजारांच्या रुग्णांना ५ ते १० टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध होणार. तसेच स्वस्तात, औषधे पुरविण्यात येणार असून, विविध भागांत केंद्र सुरू करणार.
महिला सक्षमीकरण योजना (२ कोटी ५० लाख) 
राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत प्रभागनिहाय कार्यक्रमांचे नियोजन, ज्यामुळे महिलांना सक्षमीकरणाचे धडे मिळणार. 
पादचाऱ्यांसाठी सेवा
नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मुख्य रस्त्यांवर भुयारी मार्ग, उड्डाण पूल उभारण्याचे नियोजन. 
रस्ते 
बालभारती ते पौडफाटा रस्त्याचा विकास करणार, त्यामुळे नळस्टॉप आणि पौडफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा वेळ वाचणार. चांदणी चौक विकसित करणे, ‘एचसीएमटीआर’ रस्त्याच्या कामाला गती देणे, ग्रेड सेपरेटरची उभारणी होणार.  
घाट सुशोभीकरण 
दशक्रिया विधी करण्यात येणाऱ्या संगम घाटाचे सुशोभीकरण करणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax aimed at inflation