
मांजरी : पुणे सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी व मांजरी या नव्याने समाविष्ट गावांमधून कोट्यावधी कर संकलन होते. मात्र, सुविधा पुरविण्यात महापालिकेकडून दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही विविध समस्यांशी सामना करावा लागत आहे. त्यासाठी येथील काही कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने खासदार मेधा कुलकर्णी व शेवाळेवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेवून त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.