Tea Rate Increase
sakal
वाल्हे - सकाळच्या प्रसन्न वातावरणात घेतला जाणारा चहाचा गरमागरम घोट आता खिशाला चटका देण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात झालेल्या वाढीसह दूध, चहापत्ती आणि व्यावसायिक गॅसच्या वाढलेल्या किमतींमुळे चहा विक्रेत्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे दरवाढ करायची की ग्राहक टिकविण्यासाठी आहे तेच दर कायम ठेवायचे, अशा कात्रीत व्यावसायिक सापडले आहेत.