

Teacher Award 2026 Sandeep Shinde Receives Pune District Honour After Transforming School And Guiding Students To Success
esakal
-नवनाथ भेके
निरगुडसर: अहोरात्र मेहनत घेऊन शाळा आणि विद्यार्थी हेच फक्त डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणत पटसंख्या वाढवली. ७१ विद्यार्थांना शिष्यवृत्ती धारक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे असे थोरांदळे(ता.आंबेगाव) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक संदीप बबन शिंदे यांना पुणे जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२६ शिक्षकदिनी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.