खंडाळा - शिक्षक बँकेमार्फत इंदुमती मदने यांना साडेआठ लाखाची मदत

खंडाळा - शिक्षक बँकेमार्फत इंदुमती मदने यांना साडेआठ लाखाची मदत

Published on

शिक्षक बॅंकेतर्फे मदतीचा हात

खंडाळा, ता. ४ : मुंढे (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक (कै.) विकास वसंत मदने यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. अशा वेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या वतीने आठ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
हा धनादेश प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष विजय ढमाळ यांच्या हस्ते मदने कुटुंबीयांना देण्यात आला. यावेळी संचालक महेंद्र जानुगडे, ज्ञानबा ढापरे, तपासणीस संताजी गायकवाड, शाखाप्रमुख राहुल ढाणे व कर्मचारी उपस्थित होते. घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर कुटुंबावर होणारा आघात हा मोठा असतो. अशा परिस्थितीत आर्थिक स्रोतही तत्काळ थांबतो. परिणामी, शिक्षक बँकेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. तरी यासारखे अनेक उपक्रम हाती घेणार असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष विजय ढमाळ यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाबाबत मदने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

-----
05968
कऱ्हाड ः इंदुमती मदने यांना धनादेश देताना विजय ढमाळ. त्या वेळी महेंद्र जानुगडे, ज्ञानबा ढापरे, संताजी गायकवाड, राहुल ढाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com