...हा तर कृतज्ञतेचा गौरव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

उद्योगात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा मानणाऱ्या उद्योजकाचा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या शिक्षकाचा गौरव करून खऱ्या अर्थाने कृतज्ञतेचा गौरव केला आहे.

पुणे - ‘‘बोलण्यातून आणि वागण्यातून कृतज्ञता लोप पावत असताना निराधार मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण देणाऱ्या, उद्योगात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा मानणाऱ्या उद्योजकाचा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या शिक्षकाचा गौरव करून खऱ्या अर्थाने कृतज्ञतेचा गौरव केला आहे,’’ असे मत माजी आमदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी विश्‍वस्त उल्हास पवार यांनी व्यक्त केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे कै. कृ. ब. ऊर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे वडगाव घेनंद येथे ‘स्नेहवन’ आश्रमशाळा चालविणाऱ्या अर्चना व अशोक देशमाने यांना ‘सेवाव्रती’ पुरस्कार, रेणू इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे संस्थापक, उद्योगपती अजय भागवत यांना ‘अनुकरणीय उद्योजक’ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना ‘समाज शिक्षक’ या पुरस्काराने उल्हास पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

‘भागवत, देशमाने आणि जोशी हे तिघेही योगायोगाने अभियंते आहेत; तिघांनाही मानवी समाजचे तंत्रज्ञान कळालेले आहे,’ अशा शब्दांत गौरव करताना पवार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे महत्त्वाचे नसून, चांगले आयुष्य कसे जगावे, यासाठी त्यांना घडवायला हवे.’’ 

देशमाने म्हणाले, ‘आजही अनेक मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही, त्यामुळेच आयटी कंपनीतील नोकरी सोडून मुलांना शिकविण्याचा निर्णय घेतला. आज आश्रमात ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.’’

भागवत म्हणाले, ‘‘कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रयत्न करावेच लागतात. त्याशिवाय कष्टाची जाण होत नाही.’’ विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher glory in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: