
पुणे : शिक्षकांच्या बदलीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असली तरी, नियुक्ती पत्र देण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. कारण, दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या फेरतपासणीचा प्रश्न प्रलंबितच आहे. शिक्षण विभागाकडून आणि आरोग्य विभागाकडून सध्या एकमेकांना पत्रव्यवहार सुरू आहे. त्यावर ठोस कुठलाच निर्णय झालेला नाही.