'बिनपगारी फुल अधिकारी' अशी झालीय शिक्षकांची अवस्था; काय म्हणाताहेत शिक्षक?

Tearchers_School
Tearchers_School
Updated on

पुणे : एकीकडे खासगी विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शुल्क विद्यार्थ्यांकडे थकली आहेत. तर दुसरीकडे शाळा आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून शिक्षकांचे पगार होते नसल्याचे चित्र आहे. परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षक विनापगार काम करत असून त्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे.

विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांकडून खूप कामे करून घेतली जातात. परंतु त्या तुलनेत पगार मात्र दिला जात नाही. शिक्षकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यात आता कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे काही शाळांमधील शिक्षकांना मार्च महिन्यापासून पगार दिले जात नसल्याचे शिक्षक सांगत आहेत.

विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूली झाल्यानंतरच शिक्षकांना पगार दिला जाणार असल्याचा अप्रत्यक्षरित्या पवित्रा शाळांनी घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

"गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेले नाही. मागील शैक्षणिक वर्षाची थकीत शुल्क आणि येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी शाळांकडून पालकांना सांगण्यात येत आहे. मात्र शुल्क मिळत नसल्याने आर्थिक अडचण सहन करावी लागत असल्याचे शाळा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. आणखी किती दिवस विनापगार काम करावे लागणार, याबाबत काही सांगणे अशक्य आहे. त्यामुळे पगाराविना घर चालवायचे कसे, असा प्रश्न पडत आहे,"
- एक शिक्षक (नाव न सांगण्याच्या अटीवरुन दिली प्रतिक्रिया)

"विनाअनुदानित शाळांमधील कोणत्याही शिक्षकांची लेखी किंवा फोनद्वारे अशा प्रकारची तक्रार अद्याप जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आलेली आहे. मात्र तरीही शाळांनी नियमानुसार शिक्षकांना वेतन द्यावे. याबाबत लवकरच पत्रही काढण्यात येणार आहे."
- गणपत मोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com