माजी सैनिकांच्या पेन्शनसाठी पुण्यात आजपासून पथक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pension

Pension : माजी सैनिकांच्या पेन्शनसाठी पुण्यात आजपासून पथक

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनविषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक उद्यापासून (ता.२४) पुण्यात उपस्थित राहणार आहे. हे पथक तीन दिवस पुण्यात राहून माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनविषयक सर्व अडचणी सोडविणार आहे.

रक्षा लेखा महानियंत्रक यांच्यामार्फत प्रधान रक्षा लेखा नियंत्रण- निवृत्तिवेतन (पी.सी.डी.ए-पेन्शन) प्रयागराज यांचे हे पथक असणार आहे. हे पथक निवृत्तीवेतनविषयक ‘स्पर्श’ या प्रणालीबाबत माहिती देऊन, त्यामध्ये येत असलेल्या अडीअडचणी सोडवून देणार आहे. हे पथक ता. २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत पुणे येथे उपस्थित राहणार आहे.

घोरपडी येथील हेडक्वार्टर, दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया समोर, पुणे येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तिवेतन धारक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Pensionpuneex servicemen