Team from Pune school to compete at international robotics championship in US
Team from Pune school to compete at international robotics championship in USgoogle

पुण्याची पोरं हुशार! अमेरिकेतील रोबोटीक स्पर्धेत करणार देशाचं प्रतिनिधीत्व

आंतरराष्ट्रीय फेरीत जगभरातील १६० संघ सहभागी होणार आहेत. डीन्स लिस्ट पुरस्कार प्राप्त १५० विद्यार्थ्यांचीही स्वतंत्र फेरी होणार आहे. यासाठी रोनव जैसवाल याला निमंत्रित करण्यात आले आहे.
Published on

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगरमधील बिशप शाळेचे विद्यार्थी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. फर्स्ट टेक चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील रोबोटीक स्पर्धेचे विजेतेपद या विद्यार्थ्यांनी पटकावले आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीत सहभागी होण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अमेरिकेतील होस्टन येथे ही स्पर्धा होणार असून बिशप शाळेच्या आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

Team from Pune school to compete at international robotics championship in US
पन्हाळगडाच्या पायथ्याशी रंगणार राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा...

या स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक सन्मान असलेला एफटीसी डीन्स लीस्ट फायनलिस्ट पुरस्कार बिशप शाळेच्या संघातील रोनव जैसवाल या विद्यार्थ्याला प्राप्त झाला आहे. “ सांघिक आणि वैयक्तिक पातळीवर दिले जाणारे या स्पर्धेतील हे सर्वोच्च सन्मान आहेत. देशभरातील ४१ संघांशी सामना करत बिशप शाळेने एफटीसी इन्स्पायर पुरस्कार मिळवला आहे. सर्व पुरस्कारांसाठी आघाडीचा स्पर्धक असणाऱ्या आणि इतर संघांसाठी आदर्श ठरणाऱ्या संघाला हा पुरस्कार दिला जातो”, असे शाळेचे मुख्याध्यापक शायने मॅकफर्सन आणि मार्गदर्शक सुमेश जैसवाल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय फेरीत जगभरातील १६० संघ सहभागी होणार आहेत. डीन्स लिस्ट पुरस्कार प्राप्त १५० विद्यार्थ्यांचीही स्वतंत्र फेरी होणार आहे. यासाठी रोनव जैसवाल याला निमंत्रित करण्यात आले आहे. एफटीसी ही सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा आहे. यात विद्यार्थी स्वत: रोबोटची निर्मिती करतात व इतर संघांसोबत त्याला स्पर्धेत उतरवतात. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थी अभियंत्यांप्रमाणे विचार करायला शिकतात, असे सुमेश जैसवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com