
पुणे : पुण्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने विमानाचे विजयवाडा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. या वेळी विमानात सुमारे १८० प्रवासी होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी वैमानिकाने आपत्कालीन लँडिंग केल्याचे सांगितले जात आहे. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.