esakal | ‘बांबू उद्योगात तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा’
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. रेड्डी

‘बांबू उद्योगात तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : ‘‘देशात बांबू उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून बांबू टिकवणे क्षमता तीस वर्षांपर्यंत वाढली आहे. या उद्योगवाढीसाठी ही बाब लाभदायक आहे. बांबूंच्या मूल्यवर्धनासह इतर उत्पादन करण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हायला हवा‌,’’ असे मत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: Pune : विसर्जनासाठी १९० फिरते हौद, अडीचशे ठिकाणी मूर्ती संकलन

पानशेत आंबी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या अर्थसाहाय्यातून उभारलेल्या स्वराज्य बांबू उत्पादक शेतकरी गटाच्या बांबू प्रक्रिया युनिटचे उद्‌घाटन डॉ. रेड्डी यांच्या हस्ते याप्रसंगी ते बोलत होते.या वेळी उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेचे संचालक के. पी. एस. मूर्ती, आयुध संशोधन आणि विकास आस्थापनाचे संचालक डॉ. व्ही. व्यंकटेश्वर राव, डीआरडीओच्या शास्त्रज्ञ डॉ. एन. रंजना, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ व संबंधित प्रकल्पाचे सल्लागार डॉ. पी. तेताली, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंडाळकर, तंत्र मार्गदर्शक अशोक सातपुते, स्वराज्य गटाचे अध्यक्ष अनंता निवंगुणे यांच्यासह सहकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top