esakal | Pune : विसर्जनासाठी १९० फिरते हौद, अडीचशे ठिकाणी मूर्ती संकलन
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : विसर्जनासाठी १९० फिरते हौद, अडीचशे ठिकाणी मूर्ती संकलन

Pune : विसर्जनासाठी १९० फिरते हौद, अडीचशे ठिकाणी मूर्ती संकलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत झाल्यानंतर उद्या (शनिवारी) दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जन केले जाते. त्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. शहरात १९० फिरते हौद असणार आहेत. तर २४७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे यासाठी सुमारे १९० मेट्रीक टन अमोनिअम बायकार्बोनेट वितरित करण्यात आले आहे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी शहरात विसर्जन घाट आणि हौदामध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाते. पण कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आल्याने विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे. नागरिकांची घरच्या घरी मूर्ती विसर्जन करावे यासाठी अमोनिअम बायकार्बोनेट वितरित केले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे सुमारे १३ टन अमोनिअम बायकार्बोनेट दिले आहे. तसेच १५ क्षोत्रिय कार्यालयांतर्गत २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारले आहेत. ज्या नागरिकांस घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही' अशा नागरिकांसाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधीतर्फे १९० जास्त मूर्ती विसर्जन किंवा फिरत्या हौदाची सोय उपलब्ध केली आहे.

हेही वाचा: Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा

नदीत निर्माल्य टाकू नये

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्याप्रमाणात निर्माल्य तयार होते. नदी, कॅनल, तलावात निर्माल्य टाकू नये. हे निर्माल्य महापालिकेकडे दिल्यास त्यापासून खत निर्मिती केली जाते. हे खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये वापरले जाते आणि शेतकऱ्यांना दिले जाते. फुलांच्या निर्माल्यापासून कमिन्स इंडिया कंपनीतर्फे पर्यावरणपूरक उदबत्ती तयार केली जाते, त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य कचरा वेचकांकडे द्यावे. 'निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुलेच असावेत. प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू मुर्त्या, खाद्यपदार्थ टाकू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

हेही वाचा: ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'

गतवर्षी १.६२ मूर्तींचे विसर्जन

'गेल्या वर्षी फिरत्या हौदामध्ये ८२ हजार ५५१ मूर्तींचे विसर्जन झाले. तर संकलन केंद्रावर ७९ हजार ७७७ मूर्ती गोळा झाल्या. अशा १ लाख ६२ हजार ३२८ गणेश विसर्जन झाले होते. यंदाही नागरिकांनी याच पद्धतीने विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

loading image
go to top