

बारामती, ता. १७ : गुनवडी (ता. बारामती) परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलास तिघांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) सकाळी घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा मित्रांसह येथील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी जुपिटर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वाद घालत मारहाण सुरू केली. आरोपींनी लाकडी काठी, दगड तसेच हाता-बुक्क्यांनी मारहाण केल्याने मुलाच्या कपाळाला व हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी ओंकार संदीप माने, शिवा शिरसट (पूर्ण नाव माहिती नाही) व वैभव दादा मोरे (सर्व रा. गुनवडी, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.