
खुटबाव : देलवडी (ता.दौंड) येथील या १७ वर्षीय युवकाने तेजस गणपत होनमने मोबाईलवरून सोशल मीडियावर जाहिरात करत ऑनलाइन शोभिवंत व प्रदर्शनीय पक्षी विक्रीचा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला आहे. आजीने २०२३ मध्ये दिलेल्या भांडवलावर सुरू केलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता १४ लाख रुपयांवर पोचली आहे. तेजीत असलेल्या या व्यवसायातून तेजसला वर्षभरात चार लाख रुपये नफा मिळाला आहे.