esakal | तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांची बारामतीमधील टीसी महाविद्यालयास भेट
sakal

बोलून बातमी शोधा

तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांची बारामतीमधील टीसी महाविद्यालयास भेट

लंगणांचे कृषीमंत्री रेड्डी यांनी आपल्या शिष्टमंडळासह तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास सदिच्छा भेट देत माहिती घेतली.

तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांची बारामतीमधील टीसी महाविद्यालयास भेट

sakal_logo
By
मिलिदं संगई

बारामती : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करणा-या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासारख्या संस्था सर्वत्र निर्माण व्हायला हव्यात, अशी अपेक्षा तेलंगणांचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा  : पुण्यात आणखी एका ठिकाणी आग; 500 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं

रेड्डी यांनी आपल्या शिष्टमंडळासह तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास सदिच्छा भेट देत माहिती घेतली. संस्थेच्या अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलला भेट देऊन त्यांनी कामकाजाची पाहणी केली. अनेकांतच्या विविध शैक्षणिक संस्थांसोबत तेलंगणा राज्याला काम करण्यास निश्चित आवडेल, असेही रेड्डी म्हणाले. 

संस्थेचे सचिव जवाहर वाघोलीकर, विश्वस्त मिलिंद वाघोलीकर, धवल वाघोलीकर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर व डॉ. एम.ए. लाहोरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी संस्थेच्या व्होकेशनल सेंटरमधील फुड प्रोसेसिंग, जर्नालिझम आणि रिटेल मॅनेजमेंट विभागांना भेट दिली.

प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी डॉ.एम. ए. लाहोरी यांनी माहिती दिली. 
अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलला देखील भेट दिली.

हेही वाचा : बारामतीत एकाने सुरू केले `शोले` स्टाईल आंदोलन सुरू 

बारामतीमध्ये अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी शाळा असल्याचे कौतुक त्यांनी केले. मुख्याध्यापिका राखी माथूर यांनी माहिती दिली. यावेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, उपप्राचार्य डॉ.अविनाश जगताप, डॉ.अजित तेलवे, इंद्रजित धुमाळ उपस्थित होते. 

(संपादन : सागर डी. शेलार)