
पुणे : टेमघर धरणग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश देऊन दोन वर्षे उलटली. मात्र, मोबदला न दिल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ३९ प्रकरणांमध्ये जलसंपदा विभागाला न्यायालयात खेचले आहे. मोबदला किती मुदतीत दिला जाईल, याबाबत शपथपत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने जलसंपदा विभागाला दिला आहे.