esakal | सासवडला मंदिरे खुली मात्र कोरोना नियमांबाबत दुर्लक्ष अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

संत सोपानदेव मंदिर

सासवडला मंदिरे खुली मात्र कोरोना नियमांबाबत दुर्लक्ष अधिक

sakal_logo
By
- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : संत सोपानदेव समाधी मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे वारकरी व भक्तांनी आज मंदिर खुले होताच.. बऱयापैकी गर्दी केली. समाधीला सुरवात केली त्या चिंचेच्या झाडाखालील पादुका, समाधी व इतरत्र फुलांची सजावट केली होती. मात्र स्पर्श दर्शन न घेण्यासाठी व कोणी प्रसाद न वाटण्यासाठी देवसंस्थानच्या वतीने सूचना केली जात होती. गाभाऱयाचा दरवाजा त्यासाठी बंदच ठेवला होता.

संत सोपानदेव मंदिरात विश्वस्त त्रिगुण गोसावी यांनी आज मंदिर खुले होत असल्याने भल्या पहाटे काकडारती दरम्यान समाधीची स्नानपूजा, नित्यपूजा, अभिषेक केला. त्यानंतर संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या तर्फे आणि विश्वजीत आनंदे यांच्या मार्गदर्शनात समाधी व परीसर फुलांनी व फुलमाळांनी सजविली.

हेही वाचा: IMD : पुण्यात दुपारनंतर पावसाची शक्यता

अखंड विणा विणामंडपात सुरु आहे. तिथेही शाररीक अंतर ठेवून दर्शनाच्या सूचना चोपदार सिद्देश शिंदे देत होते. सासवड (ता. पुरंदर) येथील विविध मंदिरांमध्ये सासवड नगरपालिकेने रोगजंतू, विषाणु विरोधी फवारणी आणि धुरळणी काल सुरु केली होती. त्याशिवाय मंदीर परीसरात स्वच्छताही केली होती.

शासन सूचनेनुसार विविध धार्मिक स्थळे, मंदिरे भाविकांसाठी खुली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही एकात्मिक पद्धतीने स्वच्छता मोहिम हाती घेतल्याचे पालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले. शिवाय आता रोज किमान दोनवेळा मंदिर व्यवस्थापनाने स्वच्छतेवर भर द्यावा, कोरोनाचे नियम पाळण्याचे फलक लावावेत., असे पालिकेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांच्या वतीने आज पुन्हा आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा: दाभोलकर हत्या कांड: CBIने न्यायालयात सादर केलेले पुरावे आरोपींना अमान्य

कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून गेली सतरा महिने विविध धार्मिक स्थळे बंदच होती. आज ता. 7 शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होताना मंदिरे उघडली गेली, हा योगायोग व उत्साही दिवस असल्याची प्रतिक्रीया भाविकांकडून व्यक्त झाली. मुख्य देवतास स्पर्श न करणे, प्रसाद न वाटणे, वस्तु अर्पण न करणे, बाहेर सूचना फलक लावणे, पादत्राणे वाहनात किंवा बाहेरच ठेवणे, गर्दी न करणे, मास्कचा वापर करणे आदी अनेक बाबींवर मात्र दुर्लक्ष होत असल्याचे सासवड शहरातील विविध मंदिरात भेटी दिल्यानंतर दिसून आले. संत सोपानदेव मंदिर राज्यात व्यापक प्रसिद्ध आहे. ठिक ठिकाणचे भाविक वारकरी येणार व प्रसंगी मुक्कामी राहणार त्यामुळे या मंदिरात ही काळजी विशेष घ्यावी लागणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

loading image
go to top