वेल्हे तालुक्यातील शिवकालीन देवींची मंदिरे नवरात्रोत्सवात राहणार बंद 

मनोज कुंभार
Sunday, 18 October 2020

छत्रपती शिवरायांची स्फुर्ती देवता म्हणुन मेंगाई देवी प्रसिध्द आहे तोरणा किल्ल्यावर तसेच वेल्हे गावामध्ये मेंगाई देवीचे मंदिर आहे  तसेच शिरकोली येथील शिरकाई देवी तर बाजीप्रभु देशपांडे यांची कुलदेवता अशी ख्याती असलेली वांगणी येथील मळाई देवीचे मंदिरे आहेत.

वेल्हे(पुणे) : वेल्हे तालुक्याला शिवकालीन इतिहास आहे येथे शिवकालीन देवींची मंदिरे आहेत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वेल्हेतील स्वयंभु मेंगाई देवी, शिरकोली येथील शिरकाई देवी,वांगणी येथील मळाई देवींची मंदिरे नवरात्रोत्सवात बंद राहणार असुन भाविकांनी दर्शनासाठी येवु नये असे आवाहन या तीनही ट्रस्टकडुन करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

छत्रपती शिवरायांची स्फुर्ती देवता म्हणुन मेंगाई देवी प्रसिध्द आहे तोरणा किल्ल्यावर तसेच वेल्हे गावामध्ये मेंगाई देवीचे मंदिर आहे  तसेच शिरकोली येथील शिरकाई देवी तर बाजीप्रभु देशपांडे यांची कुलदेवता अशी ख्याती असलेली वांगणी येथील मळाई देवीचे मंदिरे आहेत. नवरात्रोत्सवात कालावधीमध्ये याठिकाणी मोठ्या उत्साहात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.  हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी येथील मंदिरे बंद राहणार असल्याचे या मंदिर ट्रस्टकन सांगण्यात आले आहे.

याबाबत वेल्हे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी या तिनही ट्रस्टीतीलप्रमुखांची  बैठक आयोजित करुन शासनाकडुन आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या यावेळी मेंगाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव भुरुक, शिरकाई देवी ट्रस्टचे नाना पासलकर, मळाई देवस्थान ट्रस्टचे दिगंबर चोरघे, कांता चोरघे, अविनाश चोरघे, भागुजी चोरघे, शिवाजी चोरघे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना पार्श्वभुमीवर शासनाची काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे
१) मंदिरे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी बंद राहतील.
२) मंदिरामध्ये पूजेसाठी व मुक्कामासाठी ५ व्यक्तींनाच परवानगी आहे.
३)मंदिरामध्ये मास्क वापरणे बंधणकारक, सोशल डिस्टंन्सचे पालन आवश्यक.
४)मंदिरामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही.
५) देवींच्या पालखी मिरवणुक, छबिना काढण्यास मनाई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temples of Shiva-era goddesses in Velhe taluka will remain closed during Navratri festival