Tempo Accident
sakal
मंचर - मुंबई–दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशातील आमली जि.मंदसौर, येथे शनिवारी (ता.१६)सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणारा टेम्पो पुलावरून तब्बल २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मंचर (ता. आंबेगाव) येथील विघ्नेश अशोक शेवाळे (वय २१ रा.मंचर ता.आंबेगाव) प्रदीप शंकर खोकले (वय ३६ पिंपळवंडी १४ नंबर ता.जुन्नर) या दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला.