

Pune Airport
Sakal
पुणे - पुणे विमानतळावर शुक्रवारी येणाऱ्या पाच व जाणाऱ्या पाच विमानांची सेवा रद्द झाली. रद्द झालेल्या विमानांमध्ये इंडिगोचा समावेश होता. चेन्नई, अहमदाबादसारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या सेवेत बाधा निर्माण होत असल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याच सेक्टरमध्ये विमानसेवा रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.