मांजरी - पिसाळलेल्या कुत्र्याने दहापेक्षा अधिक जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. गुरुवारी (ता. २१) दिवसभर गावात ठिकठिकाणी ही घटना घडली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी कुत्रे पकडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना ते नदीकिनारी मृतावस्थेत आढळून आले. जखमींवर ससून व लोणीकाळभोर येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.