पुण्यातून आली आनंदाची बातमी; दहा दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त!

Ten thousand patients become corona free in ten days in Pune
Ten thousand patients become corona free in ten days in Pune

पुणे : एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुण्यात गेल्या दहा दिवसांत सुमारे 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्याही 39 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात गेल्या दहा दिवसात तब्बल 14 हजार 352 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या 51 हजारांवर पोहोचली. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 135 पोहोचली होती. मात्र, बुधवारी एका दिवसात अडीच हजार रुग्ण बरे झाले, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 861 पर्यंत कमी झाली आहे. ही संख्या कमी झाल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या 20 जुलैपासून 38 ते 39 टक्क्‍यांपर्यंत वाढली होती. ती 35 टक्क्‍यांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या बेडच्या संख्येपेक्षा वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही सतरा ते अठरा हजारांच्या वर जाऊ नये, यासाठी महापालिकेचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या वतीने सध्या तीन ठिकाणी जम्बो हॉस्पिटल उभारण्याची तयारी सुरू झाली असून, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर 800 बेडस् चे  हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात सुमारे दोन ते अडीच हजार नवे बेडस् उपलब्ध करून देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. तोपर्यंत जास्तीत जास्त रुग्ण कोरोना मुक्त कसे होतील,  असा पालिकेचा प्रयत्न आहे.

20 जुलै : 830

21 जुलै : 805

22 जुलै : 833

23 जुलै : 779

24 जुलै : 817

25 जुलै : 693

26 जुलै : 1175

27 जुलै :  896

28 जुलै : 591

पुण्यात सद्यस्थिती 

एकूण रुग्णसंख्या : 51 हजार 738

बरे झालेले रुग्ण : 32 हजार 623

एकूण मृत्यू : 1254

'व्हेंटिलेटर'वरील गंभीर रुग्ण : 432 

'आयसीयू'मधील गंभीर रुग्ण  : 413

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com