...अन् अखेर सुशोभिकरणाच्या निविदा रद्द

Tender of beautification of garden canceled due to opposition of NGOs in pune.jpg
Tender of beautification of garden canceled due to opposition of NGOs in pune.jpg

पुणे : कोरोनाचे संकट तीव्र होत असताना शहरात सुशोभिकरणाच्या कामांसाठी 38 लाख रुपयांच्या काढलेल्या निविदा स्वयंसेवी संस्थांच्या विरोधामुळे महापालिकेने अखेर रद्द केल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने फर्ग्युसन रस्ता, शनिवारवाडा येथील सुशोभिकरणाच्या विविध कामांसाठी एकूण 38 लाख रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, खासदार वंदना चव्हाण, आम आदमी पार्टीचे (आप) शहराध्यक्ष मुकुंद किर्दत,सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी या निविदांना विरोध केला होता. त्यांनी या बाबत आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडेही या बाबत चर्चा करून निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार निविदा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे पुण्यावरच नव्हे तर, राज्यात आणि देशात गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी साधन साम्रगीसाठी महापालिकेने उद्योगांना सीएसआरमधून निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेकडे असलेला निधी कशा पद्धतीने वापरायचा, खर्चाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात तरतूद आहे म्हणून खर्च करणे योग्य नाही, असे स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

या बाबत आपचे किर्दत म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा सामना करताना निधीची चणचण भासत आहे. अशा परिस्थितीत सुशोभिकरणाची कामे करण्यापेक्षा अत्यावश्यक सेवांसाठी तसेच आरोग्य, शिक्षण, दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम आदी कामांसाठी महापालिकेने आपल्या निधीचा वापर केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com